चेंडू कुरतडल्याने विंडीजच्या निकोलस पूरनवर चार सामन्यांची बंदी

351

वेस्ट इंडीजचा अष्टपैलू क्रिकेटपटू निकोलस पूरनवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) चेंडू कुरतडल्याप्रकरणी चार सामन्यांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानकिरुद्धच्या तिसऱ्या एकदिकसीय सामन्यादरम्यान चेंडू कुरतडल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली.

2017 साली ‘मुंबई इंडियन्स’कडून खेळलेल्या निकोलस पूरनने ‘आयसीसी’च्या आचारसंहिता क्रमांक तीनचे उल्लंघन केले आहे. चेंडूचा मूळ आकार कृत्रिम पद्धतीने बदलण्याचा प्रयत्न पूरनने केल्याचे व्हिडीओ फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. त्याने अंगठय़ाच्या नखाने ओरखाडे ओढून चेंडूची चमक घालविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पूरनवर चार सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. तसेच त्याच्या खात्याकर 5 डिमेरिट गुणदेखील जमा करण्यात आले आहेत. आता निकोलस पूरन किंडीसाठीचे पुढील चार टी 20 सामने खेळू शकणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या