बच्चे कंपनीला उन्हाळ्यात मिळणार मँगो स्पेशल ‘गोलमाल ज्युनियर ट्रिट’

nick-box

यंदा उन्‍हाळ्यात घरातच सुरक्षित राहणे गरजेचे आहे. याचा अर्थ असा की मुले संपूर्ण उन्‍हाळी सुट्टीदरम्‍यान त्‍यांचे मित्र व मौजमजेपासून दूर घरामध्‍येच असणार आहेत. खडतर काळाला काहीसे उत्‍साहवर्धक करण्‍यासाठी लोकप्रिय ब्रॅण्‍ड्स मॅड ओव्‍हर डोनट्स आणि निकलोडियन यांनी सहयोग केला आहे. या सहयोगाअंतर्गत मुलांमध्‍ये उत्‍साह निर्माण केला जाणार आहे आणि त्‍यांना #NickKaMangoficentSummer च्‍या माध्‍यमातून विविध संस्‍मरणीय क्षणांचा अनुभव देण्‍यात येणार आहे.

मॅड ओव्‍हर डोनट्स व निकलोडियन इंडिया आंब्‍याचा स्‍वाद असलेला डोनट्स ‘गोलमाल ज्‍युनियर ट्रिट बॉक्स’चे लिमिटेड एडिशन सादर करण्‍यास सज्‍ज आहेत. या ट्रिट बॉक्‍ससाठी विनोदी चित्रपटांची मालिका ‘गोलमाल’वर आधारित निकचा रोहित शेट्टी दिग्‍दर्शित अॅनिमेटेड शो ‘गोलमाल ज्‍युनियर’मधून प्रेरणा घेण्‍यात आली आहे.

प्रँकस्‍टर्स म्‍हणून ओळखले जाणारे गोपाल, माधव आणि इतर गोलमाल ज्‍युनियर गँग नेहमीच मुलांचे आवडते राहिले आहेत. यंदा उन्‍हाळ्यात या अनोख्‍या सहयोगाच्‍या माध्‍यमातून आमच्‍या लहान प्रेक्षकांना दुपारच्‍या वेळी निक वाहिनीवर दर सोमवार ते शुक्रवार दुपारी 12.30 वाजता गोलमाल ज्‍युनियरच्‍या खोडकर कृत्‍यांचे नवीन एपिसोड्स पाहताना हंगामी आंब्‍याची ट्रिट मिळणार आहे.

विशेषरित्‍या निर्माण केलेल्‍या ‘गोलमाल ज्‍युनिअर ट्रिट बॉक्‍स’सह मनोरंजनाचा आनंद घेता येईल. या बॉक्‍समध्‍ये मऊ डोनट्स आहेत, जे हंगामी स्‍पेशल आंबा स्‍वादांमध्‍ये उपलब्‍ध आहेत: मँगो-इन्‍फ्यूज क्रीम चीजने भरलेले व मँगो चॉकलेट कर्ल्‍स व मँगो जॅमचा थर असलेला मँगो चीजकेक; मँगो जॅम व मँगो चॉकलेट शेव्हिंग्‍ज असलेले मँगो टँगो आणि व्‍हाइट चॉकलेट, मँगो चॉकलेट व डार्क चॉकलेट गॅनच असलेले मँगो बेरी. हे अत्‍यंत स्‍वादिष्‍ट डोनट फ्लेवर्स मुंबई, पुणे, दिल्‍ली, बेंगळुरू व चेन्‍नईमध्‍ये उपलब्‍ध आहेत.

प्रँक गँग डोनट्सच्‍या लिमिटेड एडिशनला पात्रांची सोबत असणार आहे, जेथे पॅकेजवर क्रिएटिव्‍ह टून डिझाइन्‍स असण्‍यासोबत बॉक्‍सच्‍या वरील बाजूस असलेले टून पात्र ऑनलाइन ऑर्डर करणा-या लहान ग्राहकांना अद्वितीय आनंद देतील. या ट्रिट्स आमच्‍या लहान चाहत्‍यांना त्‍यांच्‍या घरांमधूनच सुरक्षितपणे मौजमजा व धमाल करण्‍याची सुविधा देतात. बाहेरील बाजूस धमाल डिझाइन्‍स आणि आतमध्‍ये स्‍वादिष्‍ट मँगो डोनट्स – मुलांना आनंदित करणारे असे उत्तम संयोजन कुठे पाहिले आहे का? लॉकडाऊन सुरू झाल्‍यापासून पौष्टिक खाद्यपदार्थांसह आवडते टून्‍स पाहण्‍याचे संयोजन खूपच यशस्‍वी ठरले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या