धक्कादायक! नऊ मजूरांचे मृतदेह विहरीत सापडले, पोलिसांना घातपाताचा संशय

916
file photo

तेलंगणातील वारंगल शहरातील एका आड विहरीत नऊ मजूरांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. या नऊ पैकी सहा जण एकाच कुटुंबातील आहे. मृतांमध्ये दोन वर्षाच्या बाळाचा देखील समावेश आहे. सुरुवातीला हे आत्महत्येचे प्रकरण असल्याची चर्चा होती मात्र पोलिसांना यात घातपाताचा संशय आहे.

cयातील सहा जणांचे कुटुंब हे करिमाबाद येथे राहायचे. मात्र लॉकडाऊन जारी झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या कारखान्याच्या मालकाकडे गोदामात राहायची परवानगी मागितली. हे सहा जणांचे कुटुंब गोदामाच्या तळमजल्यावर राहायचे तर इतर तिघे मजूर वरच्या मजल्यावर राहायचे. मृतांमध्ये 56 वर्षीय मकसूद आलम, त्यांची पत्नी निशा(48), त्यांची मुलगी बुशरा (30) तिचा मुलगा (2) व मकसूद यांचे दोन मुलगे सोहेल व शाबाद यांचा समावेश आहे. हे कुटुंब मूळचं पश्चिम बंगालचं असून गेल्या अनेक वर्षांपासून वारंगलमध्येच राहत आहे. शकील अहमद, (त्रिपुरा), श्रीराम व श्याम (बिहार) अशी इतर तिघांची नावे आहेत.

दरम्यान पोलिसांना हा आत्महत्येचा प्रकार वाटत नसून यात घातपात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. ‘जर ही आत्महत्या असती तर एकाच कुटुंबातील सहा जणांनी एकत्र केली असती. पण त्यांच्यासोबत इतर तिघांचेही मृतदेह आहेत. त्यामुळे यात काहीतरी गौडबंगाल असल्याचे वाटते’, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या