नीरव मोदी साक्षिदारांना धमकावतोय – सीबीआय

nirav-modi-new

पंजाब नॅशनल बँकेत चौदा हजार कोटींचा घोटाळा करून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी व त्याचा भाऊ नेहल हा साक्षीदारांना धमकावत असल्याचे सीबीआयने सांगितले आहे. सीबीआयने मुंबईतील न्यायालयात याबाबत पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे.

नीरव मोदीचा भाऊ नेहल व त्याच्या काही सहकाऱ्यांनी या प्रकरणातील साक्षीदार असलेले त्यांच्या कंपनीतील कर्मचारी आशिष लाढ, जिग्नेश शहा, विपीन समिथ, निलेश मिस्त्री, श्रीधर मयेकर, नेताजी मोहिते, सुबे जॉर्ज, रुषभ जेठवा आणि सोनू शैलेश मेहता हे प्रकरणी सीबीआयचे साक्षिदार आहेत. या सर्व साक्षिदारांना नेहलने त्यांच्या इच्छेविरुद्ध इजिप्त येथे नेले होते. तसेच तेथे त्यांच्याकडून काही कागदपत्रांवर सह्या करून घेण्यात आल्या आहेत, असे सीबीआयने त्यांच्या आरोपपत्रात म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या