माझी दया याचिका मागे घ्या, निर्भया प्रकरणातील आरोपीची राष्ट्रपतींकडे मागणी

2466

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी विनय शर्मा याने दाखल केलेली दयायाचिका मागे घेण्याची विनंती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना केली आहे. गृहमंत्रालयाने पाठविलेल्या दया याचिकेवर माझे हस्ताक्षर नसून ती माझी अधिकृत याचिका नसल्याचा दावा विनय शर्माने केल्याने एकच खळबळ उडाली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील सर्व दोषींना न्य़ायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी दोषी विनय शर्मा याची दया याचिका गृह मंत्रालयाने गुरुवारी राष्ट्रपतींकडे पाठवली होती. या याचिकेबाबत बोलताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बलात्काऱ्यांना दया याचिकेचा अधिकारच नसल्याचे म्हटले आहे.

आरोपीला दयेची याचिका करण्याचा अधिकार घटनेने दिला आहे, पण आता त्यावरही पुनर्विचार करायला हवा, ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हे दाखल झालेल्या म्हणजेच अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱया आरोपींना दयेचा अर्ज करण्याचा अधिकारच नाकारला पाहिजे असे राष्ट्रपती यावेळी म्हणाले. घटनेमध्ये यासंदर्भात दुरुस्ती करणे गरजेचे असून तो अधिकार देशाच्या संसदेला आहे आणि त्या दिशेने विचारही होत आहे असे ते पुढे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या