#Nirbhaya पोलिसांनी अक्षयसोबत सेक्स करायला भाग पाडलं, मुकेशचा खळबळजनक आरोप

6287
mukesh-singh-nirbhaya

देशाला हादरवून सोडणाऱ्या 2012च्या निर्भया प्रकरणात एक खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. निर्भयाचा दोषी मुकेश सिंह याने कारागृहात त्याचं लैंगिक शोषण झाल्याचा आरोप केला आहे. कारागृहातील पोलिसांनी निर्भया प्रकरणातील दोषी अक्षय याच्यासोबत मुकेशला जबरदस्तीने सेक्स करायला भाग पाडलं, असा आरोप करण्यात आला आहे. यावेळी कारागृह निरीक्षकांनीही मदत केली नाही, असंही या आरोपांमध्ये म्हटलं आहे.

मुकेश सिंह याच्याकडून युक्तिवाद करणाऱ्या अॅडव्होकेट अंजना प्रकाश यांनी हा आरोप सर्वोच्च न्यायालयात केला आहे. निर्भयाचा दोषी मुकेश सिंह याने राष्ट्रपतींनी फेटाळलेल्या दयायाचिकेविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी याचिका दाखल केली होती. त्यावर मंगळवारी सुनावणी झाली. त्यावेळी हा आरोप करण्यात आला आहे.

तसेच, मुकेशचं लैंगिक शोषण झाल्यानंतर त्याला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं नव्हतं, असाही आरोप करण्यात आला आहे. मुकेशचा भाऊ राम सिंह याची हत्या झाली होती. त्याला आत्महत्येचं स्वरूप देण्यात आलं. त्याचा एक हात निकामी होती. त्यामुळे तो गळफास लावून आत्महत्या करूच शकत नव्हता. त्यावेळी मुकेशला याबबात तक्रार करायची होती, असाही आरोप मुकेशतर्फे करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या