#Nirbhaya दोषी विनयला पाजलं जातंय विष, वकिलाची कोर्टात धाव

1611

2012च्या निर्भया प्रकरणातील दोषी फाशीपासून वाचण्यासाठी नवनवीन मार्ग शोधत आहेत. या प्रकरणातील मुख्य दोषी असलेल्या विनय याला तिहार कारागृहात स्लो पॉयझन (धीम्या गतीने परिणाम करणारं विष) दिल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे.

विनयतर्फे या प्रकरणात युक्तिवाद करणारे अॅडव्होकेट ए. पी. सिंह यांनी हा आरोप केला आहे. निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना 22 जानेवारी फाशी होणार होती. मात्र त्यानंतर 1 फेब्रुवारी रोजी फाशीची तारीख निश्चित करण्यात आली असून या चारही जणांविरुद्ध डेथ वॉरंट जारी करण्यात आलं आहे. मात्र वकील ए.पी. सिंह यांना विनय आणि अक्षय यांच्या दया याचिका दाखल करायच्या आहेत. मात्र तिहार कारागृह प्रशासनाकडून त्यांना आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता झाली नसल्याचा आरोप सिंह यांनी केला होता. त्यामुळे तिहार कारागृहाविरुद्ध त्यांनी पतियाळा कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीवेळी सिंह यांनी विनय याला कारागृहाने स्लो पॉयझन दिल्याचा आरोप केला आहे. विनय याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्याच्या तपासणीचे अहवाल देण्यात आलेले नाहीत, असंही सिंह यांचं म्हणणं आहे. सिंह यांच्या आरोपांचं तिहार कारागृह प्रशासनाकडून खंडन करण्यात आलं आहे.

16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीत सहा जणांनी निर्भयावर सामूहिक बलात्कार आणि अनन्वित शारीरिक मारहाण केली होती. या घटनेनंतर उपचार सुरू असताना निर्भयाचा 29 डिसेंबर 2012 रोजी मृत्यू झाला होता. या प्रकरणात एकूण सहा जणांवर आरोप होते. त्यातील एक असलेल्या राम सिंह याने तुरुंगातच गळफास लावून आत्महत्या केली होती. तर एका अल्पवयीन आरोपीची रवानगी सुधारगृहात करण्यात आली होती. या प्रकरणातील उर्वरित दोषी अक्षय, पवन, मुकेश आणि विनय यांच्यावरील आरोप सिद्ध झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या