#Nirbhaya Live – दोषींच्या डेथ वॉरंटवरील सुनावणी 7 जानेवारीपर्यंत पुढे ढकलली

374
 • तुरुंग प्रशासनाने दोषींना याबाबत नोटीस जारी करण्याचे न्यायालयाचे तिहार प्रशासनाला आदेश
 • दोषींना राष्ट्रपतींकडे दया अर्ज करण्यासाठी एक आठवड्यांचा अवधी
 • पतियाळा कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली
 • दोषींच्या डेथ वॉरंटवरील सुनावणी 7 जानेवारीपर्यंत पुढे ढकलली
 • दोषींना लवकरात लवकर फासावर लटकवा, निर्भयाच्या पालकांची मागणी
 • दया याचिका सादर करण्याआधी डेथ वॉरंट काढला जाऊ शकतो, सरकारी वकिलाचा युक्तीवाद
 • मुकेशला दया याचिकेसाठी अर्ज करायचा नाही.
 • विनयने याआधीच दया याचिका मागे घेतली आहे.
 • मुकेश, विनय, अक्षय, पवन यांच्या डेथ वॉरंटवर सुनावणी
 • दोषींचे डेथ वॉरंट लवकरात लवकर काढावे – निर्भयाचे वकिल
 • दोषीच्या डेथ वॉरंटवर पतियाळा कोर्टात सुनावणी सुरू
 • राष्ट्रपतींसमोर दया याचिका सादर करण्यासाठी एक आठवड्याचा कालावधी दिला जाऊ शकतो – सॉलिसिटर जनरल तुषार मेहता
 • इतर सर्व दोषींच्या डेथ वॉरंटवर 2 वाजता पतियाळा कोर्टात सुनावणी
 • अक्षय सिंग याचे वकिल एपी सिंग यांनी राष्ट्रपतींकडे दया याचिका करण्यासाठी तीन आठवड्यांचा कालावधी मागितला आहे.
 • सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

 • दोषी अक्षय सिंह याला फाशीच, पुनर्विचार याचिका फेटाळली
 • सर्वोच्च न्यायालयात निकाल वाचनाला सुरुवात
 •  दिल्लीतील नागरिकांचे आयुष्यमान प्रदूषणामुळे कमी होत असताना मृत्युदंडाची शिक्षा का दिली जावी असे त्याने याचिकेत म्हटले आहे.
 • फाशीपासून बचावासाठी त्याने सत्ययुग, कलियुग, महात्मा गांधी यांचा अहिंसेचा विचार आदी उदाहरणेही दिली आहेत.
 • दोषी अक्षय याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिल्लीतील प्रदूषणाचा आधार देत त्याने त्या शिक्षेला आक्षेप घेतला होता.
आपली प्रतिक्रिया द्या