निर्भयाची आई काँग्रेसकडून केजरीवालां विरोधात लढणार? दिलं हे स्पष्टीकरण

1346
nirbhaya mother

16 डिसेंबर 2012 ला दिल्लीत धावत्या बसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराच्य़ा घटनेने संपूर्ण देश हादरला होता. या निर्भया प्रकरणातील दोषींना 22 जानेवारीला फाशी देण्यात येणार आहे. सध्या दिल्लीत निर्भया प्रकरणावरून बऱ्याच घडामोडी घडत असतानाच निर्भयाच्या आई आशा देवी या काँग्रेसकडून निवडणूक लढवणार अशी चर्चा रंगली आहे.

निर्भयाची आई आशा देवी या त्यांच्या मुलीला न्याय मिळावा म्हणून गेली आठ वर्ष न्यायालयाचे उंबरठे झिजवत आहे. दोषींना फाशी ठोठावली असली तरी त्यावर अंमलबजावणी होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही असे त्यांनी सांगितले होते. निर्भयाचे गुन्हेगार या ना त्या मार्गाने त्यांची फाशीची शिक्षा रद्द करण्याचे किंवा लांबणीवर टाकण्याचे मार्ग शोधत आहेत. त्यामुळे त्यांचे सर्व मार्ग बंद व्हावेत यासाठी आशा देवी लढा देत आहेत.

शुक्रवारी दिल्लीत आशा देवी या काँग्रेसकडून मुख्यमंत्री व आपचे उमेदवार अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली होती. त्याबाबत बोलताना आशा देवी यांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले आहे. ‘मला राजकारणात बिलकूल रस नाही. काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याच्या मी संपर्कात नाही. मला फक्त माझ्या लेकीला न्या मिळवून द्यायचाय व दोषींना फासावर लटकलेले पाहायचेय’, असे आशा देवी यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या