शिक्षण क्षेत्रातला तारा निखळला, निर्मलदादा ग्यानाणी यांचे निधन

8

सामना ऑनलाईन । संभाजीनगर

शिक्षण क्षेत्रात आपल्ल्या कार्याने अमिट छाप सोडणारे निर्मलदादा ठाकूरदास ग्यानाणी यांचे शुक्रवारी संभाजीनगरमध्ये निधन झाले. ते 84 वयाचे होते. शिक्षण क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे पद्मविभूषण स्व. गोविंदभाई श्रॉफ, महाराष्ट्र शासनाचा स्काऊट जीवन गौरव आणि भारतीय शिक्षण मंडळाचा जीवन गौरव देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. त्यांच्या जाण्याने शिक्षण क्षेत्रात भरून न येणारी पोकळी निर्माण झाल्याची प्रतिक्रिया लोकांनी व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या