भडकावू भाषण केल्याप्रकरणी भाजपचे आमदार नीतेश राणे यांच्याविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ रविवारी नगरमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चानंतर झालेल्या सभेमध्ये भाजप आमदार नीतेश राणे यांनी मुस्लिम समाजावर टीका केली. तसेच दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होईल अशी वक्तव्ये केली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये आयोजक दिगंबर गेंटय़ाल यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आमदार राणे यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात आज मुस्लिम समाजातील महिलांनी मोर्चा काढून निषेध केला. तर, दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणारे भाषण करणाऱया आमदार राणे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बहुजन वंचित आघाडीने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.