निती आयोगाच्या उपाध्यक्षांकडून आचारसंहिता भंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

गरीब कुटुंबाला वर्षाला 72 हजार रुपये देण्याचे आश्वासन काँग्रेसने आपल्या न्याय योजनेद्वारे दिले आहे. त्यावर टिप्पणी करून निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग केला, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

हे आश्वासन निवडणुकीपुरते असून ही न्याय योजना प्रत्यक्षात राबवणे अशक्य आहे. ही योजना देशाच्या अर्थव्यवस्थेच्या हिताची नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या या आश्वासनावर कुमार यांनी दिली होती. यासंदर्भात काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. यानंतर आयोगाने कुमार यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले. यावर हे माझे वैयक्तिक मत आहे, असल्याचे स्पष्टीकरण कुमार यांनी दिले.