आत्मनिर्भरतेचा वसा! सरकार स्वदेशी उद्योगांना शक्य ती सर्व मदत करणार

हिंदुस्थान आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने पावले टाकत आहे. यासाठी सरकार स्वदेशी उद्योगांना शक्य ती सर्व मदत करेल, त्यांना हवे असलेले अनुकूल वातावरण उपलब्ध करेल, अशी घोषणा नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी शुक्रवारी केली. जागतिक अर्थव्यवस्थेशी तसेच व्यापार व्यवस्था खुली करण्याबाबत हिंदुस्थान कटिबद्व आहे, असेही त्यांनी नमूद केले.

फिक्की या उद्योग क्षेत्रातील आघाडीच्या संस्थेने शुक्रवारी व्हर्च्युअल कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी बोलताना राजीव पुमार यांनी ’आत्मनिर्भर भारत’चे उद्दिष्ट तसेच अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यावर भर दिला. ते म्हणाले की, प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीला (एफडीआय) चालना देताना हिंदुस्थानात आधीपासूनच गुंतवणूक केलेल्या उद्योगांवर अधिक विश्वास दाखवला जाईल. सरकार खाजगी उद्योगांना शक्य ती सर्व मदत करेल, त्यांना आणखी संधी उपलब्ध करून देईल. ते उद्योग स्वदेशी असो वा विदेशी, त्यांच्याशिवाय हिंदुस्थान अपेक्षित स्थिर विकास दर गाठू शकत नाही, असे राजीव पुमार यांनी सांगितले. आपण हे सर्व करू. इतर देशांनीसुद्धा अशाच प्रकारे धोरण अवलंबले आहे. जागतिक आणि क्षेत्रीय उत्पादन साखळीमध्ये स्वतŠचा ठसा उमटवण्याचा प्रयत्न करीत असलेल्या हिंदुस्थानात हे सर्व आता केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

आणखी 9 ते 10 क्षेत्रांसाठी पीएलआय योजना राबवणार
सरकारने याआधी औषध, चिकित्सा उपकरण, मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादन कंपन्यांसाठी उत्पादन आधारित प्रोत्साहन (पीएलआय) योजना राबवली आहे. ही योजना आणखी 9 ते 10 क्षेत्रांसाठी राबवली जाईल, असे राजीव पुमार यांनी यावेळी सांगितले. जागतिक पातळीवरच्या उत्पादनासाठी गुंतवणूकदारांना प्रोत्साहीत करणे हा पीएलआय योजनेचा हेतू आहे. सरकारने कोरोना महामारीकडे एक संधी म्हणून पाहिले आहे, असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या