गडकरी आज भागवतांना भेटणार

राज्यातील सत्तास्थापनेचा पेच काही केला सुटत नसल्याने गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजप नेत्यांची धावपळ सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतल्यानंतर दुसऱयाच दिवशी रात्री नागपूर येथील संघ मुख्यालयात जाऊन सरसंघसंचालक मोहन भागवत यांची भेट घेऊन चर्चा केली.

त्यानंतर भाजप नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गुरुवारी सरसंघचालक भागवत यांची भेट घेणार असून यामध्ये महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये सरसंघचालकांचा शब्द हा अंतिम मानला जातो. त्यामुळे संघ मुख्यालयातून गडकरींना काय सूचना दिल्या जातात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी भागवतांची भेट घेतल्यानंतर ते शिवसेनेसोबतच सरकार स्थापन करावे यासाठी आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या