आयुक्त मुंढे यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल, 1 सप्टेंबरला नाशिक पालिकेची विशेष महासभा

24

सामना प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या एकतर्फी कारभाराविरुद्ध नगरसेवकांनी दंड थोपटले आहेत. आज स्थायी समितीच्या पंधरा सदस्यांनी मुंढेंवर अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. यावर चर्चा करण्यासाठी महापौर रंजना भानसी यांनी 1 सप्टेंबर रोजी विशेष महासभा बोलावली आहे.

करमूल्य दरात वाढ करून आयुक्त मुंढे यांनी नाशिककरांवर अवाच्यासवा कर लादला आहे. सिडकोच्या घरांच्या बांधकाम परवानग्याही बंद केल्या आहेत. अधिकारी, कर्मचाऱ्यांवर सतत कारवाईचा बडगा उगारला जात आहे. यामुळे ते दबावाखाली काम करीत आहेत. नगरसेवक निधीवर गंडांतर आले असून आयुक्तांकडून नगरसेवकांचा अवमान केला जातो. त्यांच्या हुकूमशाही कारभारामुळे कामकाज ठप्प झाले आहे. करवाढ आणि कामकाजाबाबत पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत बैठक होऊनही आयुक्तांनी जुमानले नाही. यामुळे महापौर, उपमहापौर यांच्यासह महापालिकेतील पदाधिकारी आयुक्तांवर नाराज आहेत.

नगरसचिवांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल
सोमवारी स्थायी समितीच्या पंधरा सदस्यांनी मुंढे यांच्याविरुद्ध नगरसचिवांकडे अविश्वास ठरावाचा प्रस्ताव दाखल केला. विशेष महासभेची मागणी केली. या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी 1 सप्टेंबरला सकाळी साडेअकरा वाजता विशेष महासभा बोलावण्यात आली आहे.

summary- no confidence motion against tukaram mundhe

आपली प्रतिक्रिया द्या