दिलासादायक!  बुलढाण्यात आज एकही कोरोनाचा रुग्ण नाही आढळला, 14 रुग्ण कोरोनामुक्त

दिवसेंदिवस कोरोनाचे संकट वाढत असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. बुलढाण्यात आज एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. तसेच आज 14 कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत.

बुलढाण्यात  आजपर्यंत 3106 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 190 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.  आज 6 जुलै रोजी 31 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 31  निगेटीव्ह आहेत.  आज रोजी 372 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 3106 आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 300 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 190 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 97 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 13 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या