मुंबई – गोवा महामार्गावर आज अवजड वाहनांना नो एण्ट्री

होळी व धूलिवंदन सणासाठी चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकणातील आपल्या गावी आले आहेत. तसेच या सणांना लागून शनिवार व रविवार आल्याने पर्यटक मोठ्या संख्येने कोकणातील पर्यटनस्थळांवर दाखल झाले असून धम्माल करून सर्वजण रविवारी परतीच्या प्रवासाला लागणार आहेत. त्यामुळे या काळात ट्रॅफिक होऊ नये यासाठी उद्या रविवारी महामार्गावर अवजड वाहतुकीला नो एंट्री करण्यात आली आहे.

दुपारी 12 ते मध्यरात्री 12 पर्यंत मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककोंडी निर्माण होऊ नये यासाठी महामार्गावर कशेडी ते खारपाडादरम्यान जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवांना यातून वगळण्यात आले आहे.