अभियांत्रिकी प्रवेशासाठी मुदतवाढ नाही, हायकोर्टाने फेटाळली याचिका

mumbai bombay-highcourt

अभियांत्रिकी प्रवेशाची कागदपत्रे जमा करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी करणारी विद्यार्थ्याची याचिका उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली.

न्या. सुनील शुव्रे व न्या. फिरोज पुनावाला यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. एका विद्यार्थ्याला अशी सवलत दिली तर अन्य विद्यार्थ्यांनाही अभियांत्रिकी प्रवेशाची कागदपत्रे जमा करण्यासाठी मुदतवाढ द्यावी लागेल. अन्य विद्यार्थी यासाठी याचिका करतील. प्रत्येकाचे म्हणणे ऐकावे लागेल. आम्ही कोणालाही अशी सवलत देणार नाही, असे नमूद करत खंडपीठाने त्या मुलाची याचिका फेटाळून लावली. पुणे येथील आर्यन ऐंडलेने ही याचिका केली होती.