‘आयपीएल’ आमच्या देशात होणार नाही, न्यूझीलंडकडून चर्चांना पूर्णविराम

608

हिंदुस्थानात कोरोना काढत चालल्यामुळे आता सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत होणारी स्पर्धा न्यूझीलंड, श्रीलंका किंवा यूएई येथे पार पडेल, अशी चर्चा क्रिकेट कर्तुळात रंगू लागली होती; पण न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे प्रवक्ता यांनी गुरुवारी या चर्चांना पूर्णविराम देताना म्हटले की, ‘आमच्या देशात आयपीएल होणार नाही.’

याप्रसंगी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे रिचर्ड बूक म्हणाले, ‘न्यूझीलंडमध्ये आयपीएल होण्याची शक्यता आहे, अशा प्रकारच्या बातम्या मीडियामधून प्रसिद्ध होत आहेत. मात्र, आमच्या देशात आयपीएल होणे शक्य नाही. बीसीसीआयकडून आमच्याकडे याबाबत कोणताही प्रस्ताव आलेला नसून, आम्हीही आयोजनासाठी त्यांच्याकडे मागणी केलेली नाही. त्यामुळे न्यूझीलंडमध्ये आयपीएल होईल, अशा बातम्यांना काहीही अर्थ नाही,’ असेही ते पुढे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या