
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नालेसफाई, स्वच्छता व रस्त्याच्या दुरूस्तीची कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश आज पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी 24 तास मोबाईल चालू ठेवावेत, तसेच कामाच्या वेळी या अधिकाऱ्यांचा मोबाईल स्विच ऑफ असल्याचे आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आयुक्तांनी दिलाय त्यामुळे बेफिकीर अधिकाऱ्यांचे या आदेशाने धाबे दणाणले आहेत.
ठाणे पालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे आज मान्सूनपूर्व तसेच मान्सून कालावधीक करावयाच्या कामांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. कोरोनाचा संसर्ग कमी असला तरी पावसाळ्यात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी वेळोवेळी औषध फवारणी तसेच इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना निर्माण करण्याच्या सूचना आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी आज बैठकीत दिले. तसेच ठाणे शहरातील आपत्कालीन कक्ष 24 तास सुरू राहील याकडे विशेष काळजी घेण्यात यावी तसेच अग्निशमन विभागानेदेखील याबाबत सतर्क राहण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. सध्या रस्त्यांच्या दुरूस्तीची जी कामे सुरू आहेत ती कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे तसेच घनकचरा विभागाच्या वतीने प्रत्येक प्रभाग समितीनिहाय साफसफाई करण्यासोबत शहरातील संपूर्ण नालेसफाई वेळेत पूर्ण करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उपायुक्त मनीष जोशी, जी.जी. गोदेपुरे, दिनेश तायडे, अनघा कदम, शंकर पाटोळे, ठाणे पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अविनाश सावंत आदी उपस्थित होते.

























































