वर्षभरापासून तयार केलेल्या नाल्या तुंबल्या, डासांच्या प्रादुर्भावाने नागरिक हैराण 

25

सामना प्रतिनिधी । चारठाणा 

जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील नालीकामास वर्ष उलटले असताना आजपर्यंत त्या नाल्याची साफसफाई केली गेली नाही. परिणामी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. डासांचा प्रार्दुभाव वाढून डेंग्यु सदृश्य आजार होतो की काय अशी भिती नागरिक व्यक्त करत आहेत. तत्काळ नाल्याची साफ सफाई करावी नागरिकांमधून जोर धरु लागली आहे.

जिंतूर तालुकातील चारठाणा येथे गेल्या वर्षी मध्ये नवीन रस्ता व नालीची विकास कामे झाले आहेत. तेव्हा पासून येथील ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत त्या वर्षी पासून आजतागायत परिसरातील संपूर्ण नाल्याची साफसफाई केली नाही. तर येथील काही प्रभागात सफाई कर्मचारी फिरकत नसल्याने नाला केरकचर्‍याने तुंबून गेल्या आहेत. परिणामी नालीतील पाणी रस्त्यावर वाहत असून, दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. उग्र वासाने परिसरातील नागरिक बेजार झाले आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून डासांचे प्रमाण वाढले आहे.

मागील काही दिवसांपासून धूर फवारणी होत नसल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव झाला आहे. डेंग्यु सदृश्य आजारने अधीच तोंड वर काढले असून नागरिकामंध्ये भीतीचे वातावारण पसरले आहे. या शिवाय अवघ्या काही दिवसांवर दिवाळी हा मोठा सण येऊन ठेपला असून परीसरातील ग्रामपंचायत कार्यालयाच्या अंतर्गत साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकातून  जोर धरु लागली आहे.

घंटागाडी गायब 

अनेक ठिकाणी प्रभागात ग्रामस्थांनी घरातील कचरा रस्त्यावरच टाकला जात आहे. यामुळे अनेक ठिकाणी कचरा कुंडीचे स्वरुप आले आहे. हा कचरा मोकाट जनावर व डुक्कर इतरत्र पसरवत आहेत. मुख्य रस्ता व चौकांमध्ये मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. ही मोकाट जनावरे रस्त्यावर बसत असल्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविणे अवघड झाले आहे. तसेच पादचार्‍यांनाही रस्त्यावरून ये-जा करणे अवघड झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या