आता नोकियाचा स्मार्ट टीव्ही येणार

878

नोकियाचे सर्व अधिकार असलेली फिनलॅँडची कंपनी एचएमडी ग्लोबल आता हिंदुस्थानी बाजारपेठेत पहिला स्मार्ट टीव्ही घेऊन येणार आहे. हा नोकिया टीव्ही जागतिक स्तरावर लॉँच करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. गेल्या महिन्यात मोटोरोला कंपनीनेही फ्लिपकार्टसोबत मिळून टीव्ही लॉँच केला. हिंदुस्थानी ग्राहकांच्या अपेक्षा समजून घेऊन या टीव्हीची निर्मिती करण्यात आली आहे. टीव्ही मॅन्युफॅक्चरिंग आणि डिस्ट्रिब्यूशन नोकिया ब्रॅण्डअंतर्गत करण्यात येणार आहे. कंपनीने यासाठी हिंदुस्थानी बाजारपेठ आणि ग्राहकांशी निगडित रणनीती आखली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या