सामान्यांना दिलासा, सिलिंडरच्या दरात कपात

प्रातिनिधीक फोटो

देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलेले असल्यामुळे सर्वजण चिंतेत असताना सामान्य नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने घरघुती वापराच्या विना अनुदानित सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. मुंबईत आता एका सिलिंडरसाठी 714 रुपये मोजावे लागणार आहे.

जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाल्यामुळे विना अनुदानित सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. 1 एप्रिलपासून सिलिंडरचे दर मुंबईत प्रती सिंलिंडर 714 रुपये, दिल्लीत 744 रुपये होणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या