उकाड्याने देवही झाले हैराण! पुजाऱ्यांनी दाखवला कोल्ड्रिंक, चॉकलेट्सचा नैवेद्य

612

उत्तर हिंदुस्थानात सध्या उन्हाळ्याची तलखी भीषण झाली आहे. सामान्यांना जीव नकोसा करून सोडणाऱ्या या उन्हाळ्यांनी देवांनाही हैराण केल्याचं चित्र दिसत आहे. कारण, वाराणसीतील मंदिरांमध्ये पुजाऱ्यांनी देवाला कोल्ड्रिंक, चॉकलेट्स यांचा नैवेद्य दाखवायला सुरुवात केली आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, सध्या लॉकडाऊनमुळे मंदिर बंद असलं, तरी मोजक्या पुजाऱ्यांच्या उपस्थितीत देवाची नित्यपूजा होत असते. त्यात उत्तर हिंदुस्थानात तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअस इतका झाला आहे. परिणामी वाराणसी, काशी येथे उन्हाळ्याच्या झळांची तीव्रता मंदिरांमध्येही जाणवत आहे. देवाला उन्हाळ्याचा त्रास जाणवू नये आणि त्याची कृपादृष्टी राहावी म्हणून मंदिरातील पुजाऱ्यांनी देवाच्या नैवेद्यात थोडा बदल केला आहे.

coldrink-chocolates

काशी येथील बाबा बटुक भैरव मंदिरात कोल्ड्रिंक आणि चॉकलेट्सचा नैवेद्य दाखवण्यात येत आहे. भगवान शंकराच्या आठ रुपांपैकी एक असलेल्या या मंदिरात शिवशंकराच्या बाल स्वरूपाची पूजा केली जाते. बटुक भैरव मंदिरात एअर कंडिशनर, पंखे आणि एक्झॉस्ट फॅनही बसवण्यात आले आहेत. जेणेकरून देवाला उन्हाळ्याचा त्रास होऊ नये. हीच व्यवस्था अन्य मंदिरात करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या