दुबईतील कुवैत स्ट्रीटवर असलेल्या वेस्ट झोप प्लाझा अपार्टमेंटमध्ये 7 तारखेला सकाळी ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांचे आगमन होणार आहे.
महाराष्ट्रच नव्हे, तर जगभरातील विविध देशांमध्ये स्थायिक झालेले मराठी कुटुंबीय हा उत्सव तेवढ्याच जल्लोषात साजरा करतात. महाराष्ट्रच नव्हे, तर जगभरातील विविध देशांमध्ये स्थायिक झालेले मराठी कुटुंबीय हा उत्सव तेवढ्याच जल्लोषात साजरा करतात. लाडक्या बाप्पांच्या स्वागताची तयारी देशभरात नव्हे, तर विविध देशांमध्ये सुरू झाली आहे.
यंदा Inspire Events आणि दुबईतील विविध सामाजिक संघटना, कंपन्या, सांस्कृतिक मंडळे व मित्रपरिवार यांनी दुबई येथे प्रथमच सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करण्याचा निर्णय एकत्रितपणे घेतला आहे. दिवसभर भजन व सामूहिक गणेश जाप, दुपारची आरती, सांस्कृतिक कार्यक्रम, संध्याकाळची आरती, गणेश भजन व जागरण हे कार्यक्रम होतील. 8 सप्टेंबर रोजी गणेशपूजन आणि आरती, भजन व सामूहिक गणेश जाप, संस्कृती मराठी मंडळाचे सामुदायिक अथर्वशीर्ष पठण होणार आहे. संध्याकाळची आरती आणि ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक, गणेश विसर्जन व सांगता आरती होईल.
केवळ गणेशोत्सव नव्हे, तर नवरात्र, दसरा-दिवाळी, आषाढी एकादशी, गुढीपाडवा, शिवजयंती, शिवराज्याभिषेक दिन सोहळा, कोजागरी पौर्णिमा, भोंडला, मंगळागौर आणि अन्य सण-उत्सवही येथे उत्साहात साजरे केले जातात. शिक्षण, नोकरी व्यवसायानिमित्त अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, दुबई आणि अन्य देशांमध्ये मराठी कुटुंबीय स्थायिक झाली.आहेत. काही वर्षांपूर्वी ही संख्या कमी होती. आता मात्र सर्वत्र ही संख्या वाढत आहे. परदेशात स्थायिक झाले असले, तरी मराठी कुटुंबीयांनी संस्कृतीबरोबरच महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसाही जपला आहे. गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळीयाबरोबरच वर्षभरातील विविध सण उत्सव दिमाखात साजरे केले जातात.
विसर्जनासाठी परवानगी
गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करण्यात येत असला तरी आखाती देशांमध्ये विसर्जनाला परवानगी नव्हती. नुकतीच त्यासाठी परवानगी मिळाली आहे. विसर्जनासाठी एक बोट सज्ज ठेवण्यात आली आहे. बोटीतून समुद्रात जाऊन ‘श्रीं’ च्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. गणेशोत्सव अत्यंत जल्लोषात साजरा होतो. महाराष्ट्र मंडळातर्फे या उत्सवाचे नियोजन केले जाते. दुबई आणि अबूधाबीत साधारणतः 700 ते 800 मराठी कुटुंबीय गणेशोत्सव साजरा करतात, घरोघरी हा उत्सव अत्यंत दिमाखात साजरा होतो. पुणे, मुंबई, कोकण येथून सुमारे महिन्यापूर्वी ‘श्रीं’च्या मूर्ती मागविण्यात येतात. पौरोहित्य करणारे पाच ते सहाजण आहेत. ते घरोघरी जाऊन विधिवत श्री गणेशाची प्रतिष्ठापना करतात.