बुरखा घालत नाही म्हणून मुस्लिम विद्यार्थिनींचा छळ, पोलिसांत तक्रार

557

उत्तर प्रदेशमध्ये बुरखा नाही घातला म्हणून मुस्लिम विद्यार्थिनींना त्रास दिला जात आहे. या प्रकरणी पीडित विद्यार्थिनींनी पोलिसांत धाव घेतली आहे.

उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर मधील सराय मुर्तजा कॉलनीमध्ये काही लोक विद्यार्थिनींना त्रास देत होते. बुरखा घातला नाही म्हणून इथले काही लोक त्यांचा छळ करत होते. जर बुरख्याविना मुलींना कॉलेजमध्ये जाण्यास पालकांना काहीच अडचण नाही तर या लोकांना काय अडचण आहे असा प्रश्न विद्यार्थिनींनी विचारला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी स्थानिक लोकांची बैठक घेतली. पोलिसांनी आरोपींना समज दिली आहे. तसेच वेळीच वर्तन न सुधारल्यास गुन्हा दाखल करून अटक केली जाईल असे सांगितले. समाजातील काही लोक, स्थानिक नागरिक आणि धर्मगुरूंनी पोलिसांना आश्वासन दिले की मुलींना आता कुठलाच त्रास होणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या