जबरदस्त बातमी – रेल्वे उशिरा पोहोचल्यास ₹ 250 पर्यंत मिळणार रिफंड

1078
tejas-26

रेल्वे सेवेत खासगी क्षेत्राचा प्रवेश झाला असून देशातील पहिली खासगी ट्रेन ‘तेजस एक्सप्रेस’ला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनऊ जंक्शन येथून हिरवा झेंडा दाखवला. तेजस एक्सप्रेस लखनऊ ते दिल्ली दरम्यान धावणार असून यामुळे कमी वेळात प्रवाशांना अत्यंत आरामदायी असा प्रवास करता येणार आहे. या एक्सप्रेसमधून प्रवास करण्यासाठी तिकिटाचे दर देखील निश्चित करण्यात आले असून आठवड्यातील 6 दिवस ही सेवा सुरू असेल. 4 ऑक्टोबर म्हणजे आजपासून आपण यासाठीचे तिकीट बुकिंग करू शकणार आहात.

विशेष म्हणजे रेल्वेच्या भोंगळकारभारामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होतात, तसेच अनेकदा निश्चित वेळेत गाडी गंतव्यस्थानी न पोहोचल्याने प्रवाशांना त्याचा तोटा सहन करावा लागतो. मात्र आता रेल्वेने त्यावर पहिले पाऊल उचलले आहे. गाडी लेट झाल्यास प्रवाशांना रिफंड मिळणार आहे. तेजस एक्सप्रेसला पोहोचण्यास एक तास उशीर झाल्यास 100 रुपये दिले जातील, तर दोन तास उशीर झाल्यास 250 रुपयांपर्यंत रिफंड प्रवाशांना देण्यात येणार आहे.

तेजस एक्पप्रेसची वैशिष्टे वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 

आपली प्रतिक्रिया द्या