गणपती बाप्पा मोरया 2025 – आता साखर वाढण्याची चिंता नाही, मोदक खा बिनधास्त.. करुन बघा हेल्दी शुगरफ्री मोदक

अवघ्या काही तासांमध्ये देशभरात बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भगवान गणेशाला त्यांचे आवडते भोग मोदक अर्पण करण्याची परंपरा न विसरता पाळली जाईल. परंतु आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि मधुमेहासारख्या आजारांमुळे बरेच लोक गोड पदार्थ खाणे टाळतात. अशा परिस्थितीत, प्रश्न उद्भवतो की बाप्पाला साखरमुक्त मोदक अर्पण करता येईल का? उत्तर आहे…हो

 

गणपती बाप्पा मोरया 2025 – लहानांच्या आवडीचे चॉकलेट मोदक करण्यासाठी लागेल फक्त अर्धा तास

पारंपारिक मोदकाच्या सारणात साखर किंवा गूळाचा वापर केला जातो. परंतु यापेक्षा आपण साखरमुक्त मोदक केल्यास मधुमेही सुद्धा न घाबरता मोदक खाऊ शकतील. साखरमुक्त मोदक बनवण्यासाठी फक्त २५-३० मिनिटे लागतात.

शुगर फ्री मोदक कसे बनवायचे?

सर्वप्रथम पाणी घालून कणिक मळून घ्या आणि थोडा वेळ झाकून ठेवा.

दुसरीकडे, एका पॅनमध्ये तूप गरम करा आणि नारळ भाजून घ्या आणि त्यात गूळ पावडर घाला.

त्यानंतर वेलची पावडर आणि चिरलेला सुका मेवा घालावा.

गणपती बाप्पा मोरया 2025 – लाडक्या बाप्पासाठी बनवून बघा सर्वात सोपे आरोग्यासाठी उत्तम मावा मोदक, वाचा

लहान कणकेचा गोळा घ्या, त्यात हे मिश्रण भरा आणि त्याला मोदकाचा आकार द्या.

त्यानंतर हे मोदक वाफवण्यासाठी १५ मिनिटे ठेवावे.

सर्वात शेवटी त्यावर केशराची कांडी लावाली आणि खाताना तूप घालून खावा.