
मेटाची कंपनी इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सऍपने आपल्या यूजर्ससाठी अनेक नवीन फिचर्स जारी केले आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचे फिचर्स म्हणजे व्हॉट्सऍपमध्ये आता इमेज एडिटिंगला सपोर्ट मिळणार असून एआय चॅटबॉटच्या मदतीने फोटो पाठवण्याआधी एडिट करण्याची सुविधा यूजर्सला मिळणार आहे. हे फिचर्स सध्या निवडक यूजर्ससाठी उपलब्ध करण्यात आले आहे. एआय रायटिंग हेल्पच्या मदतीने यूजर्सला आता उत्तरही ड्राफ्ट करण्याची सुविधा मिळणार आहे. हे फिचर सध्या हळूहळू रोलआऊट केले जात असून लवकरच सर्व यूजर्ससाठी उपलब्ध होईल. व्हॉट्सऍपवर स्टिकर चॅट सर्वात गमतीशीर भाग आहे. पर्सनल चॅट किंवा ग्रुप चॅट करताना यूजर्सला कोणता इमोजी हवा आहे याची माहिती मिळेल. तसेच हे इमोजी सहज स्टिकरमध्ये बदलता येईल. नव्या फिचरमुळे आता अँड्रॉइड व्हर्जन यूजर्सप्रमाणे आयफोन यूजर्ससुद्धा व्हॉट्सऍपवर दोन अकाऊंट्सला एका सिंगल डिव्हाइसवर चालवू शकतात. हे फिचर बिझनेस यूजर्ससोबत वर्क आणि पर्सनल लाइफ वेगवेगळे ठेवणाऱयांसाठी फायदेशीर आहे. व्हॉट्सऍपमध्ये आधीच चॅट ट्रान्सफर फिचर उपलब्ध आहे. यूजर्सला आपली चॅट हिस्ट्री आयओएसने अँड्रॉइडमध्ये ट्रान्सफर करता येऊ शकते.




























































