पिकलेले केस होतील काळे कुळकुळीत, चहापावडरमध्ये फक्त 5 रुपयांचा हा घटक घाला, वाचा सविस्तर

आजकाल लहान वयात केस पांढरे होऊ लागले आहेत. तसेच केसांचे तुटणे आणि केस गळणे ही समस्या तर सर्व सामान्य झालेली आहे. केसांचा रंग आणि रासायनिक शाम्पूवर हजारो रुपये खर्च करतात, परंतु त्याचे परिणाम होत नाहीत. अनेकदा तर हे उपाय केल्याने नुकसान अधिक होते. पांढरे केस काळे करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे घरगुती उपाय.

नाभीमध्ये तूप घालण्याचे आश्चर्यकारक फायदे, महिलांनी हा उपाय करुन पाहायला हवा

याकरता आपल्याला फक्त दोन पदार्थ हवे आहेत. चहा पावडर आणि आले. या दोन्हींमुळे तुमचे केस मजबूत होतीलच. शिवाय यामुळे केसांना नैसर्गिक चमकही प्राप्त होईल.

एका पॅनमध्ये पाणी उकळवा. २ चमचे चहा पावडर आणि आल्याचे छोटे तुकडे घाला.
हे मिश्रण २० मिनिटे उकळवा.
थंड झाल्यावर, गाळून घ्या आणि बाटलीत भरून ठेवा.
केस धुण्यापूर्वी २ तास आधी ते टाळू आणि केसांना लावा.

एरंडेल तेल की खोबरेल तेल? त्वचेसाठी कोणते तेल सर्वात उत्तम, वाचा

फायदे

नैसर्गिकरित्या केस काळे होतात. तसेच यामध्ये असणारी अँटीऑक्सिडंट्स आणि टॅनिन डोक्यावरील त्वचेसाठी खूप उपयुक्त असतात. हे पाणी वापरल्याने,
डोक्यातील कोंडा कमी होतो आणि केसही कमी गळतात.

केसांसाठी आल्याचे फायदे

आल्यामुळे टाळूचे रक्ताभिसरण वाढण्यास मदत होते. तसेच आल्यातील अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म टाळूचे आरोग्य सुधारतात.
केसांचा कोरडेपणा आणि खाज कमी करते. रासायनिक उत्पादनांपासून मिळणाऱ्या तात्पुरत्या परिणामांऐवजी, हा उपाय नैसर्गिक, किफायतशीर आणि परीणामकारक नक्कीच आहे.