आता देशांतर्गत स्पर्धेतही सामनावीर आणि मालिकावीर

बीसीसीआयने आता आंतरराष्ट्रीय स्पर्धांप्रमाणे देशांतर्गत होणाऱ्या स्पर्धांमध्ये ‘सामनावीर’ आणि ‘मालिकावीर’ खेळाडूंना रोख बक्षीस देणार असल्याचे जाहीर केले. तसेच ज्युनियर आणि महिलांच्या स्पर्धेतही हे दोन्ही पुरस्कार सुरू केले जाणार असल्याची माहिती बीसीसीआय सचिव जय शहा यांनी दिली.

बीसीसीआयने गेल्या वर्षी रणजी ट्रॉफी सर्व स्पर्धांची पुरस्कार रक्कम वाढवली होती. रणजी विजेत्यांचे इनाम एक कोटीवरून पाच कोटी केले तसेच इतर स्पर्धांच्या बक्षिसांत घसघशीत वाढ केली होती. इराणी असो किंवा दुलीप ट्रॉफी, विजेत्यांना 50 लाख तर उपविजेत्या संघाला 25 लाखांचा पुरस्कार बीसीसीआयने गेल्या वर्षी प्रथमच दिला होता. त्यामुळे सर्व खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. देशांतर्गत क्रिकेटमध्येही खेळाडूंची कामगिरी उंचवावी म्हणून बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे.