
राज्यात गुन्हेगारी सातत्याने वाढतेय. सायबर गुह्यांनी तर कळस गाठला आहे. त्यामुळे पोलिसांवर कामाचा अतिरिक्त भार वाढला आहे. महायुती सरकारला मात्र पोलिसांची काळजी नाही. पोलिसांची संख्या वाढवण्यास प्राधान्य देण्याऐवजी गृह विभागाने आजपासून गुन्हे तपासाचा बोजा हेड कॉन्स्टेबलवर टाकला आहे. छोटय़ा गुह्यांचा तपास करण्याचे काम हेड कॉन्स्टेबलना दिले जाणार आहे.
या अटींवर मिळणार अधिकार
– हेड कॉन्स्टेबल पदवीधर असावा
– सात वर्षे सेवा पूर्ण केलेली असावी.
– नाशिकच्या गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयात त्याने सहा आठवडय़ांचे विशेष प्रशिक्षण पूर्ण करून परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.