आता गुगलवर मोजा अंतर आणि क्षेत्रफळ

सामना ऑनलाईन ,लंडन

ऍपलपाठोपाठ आता गुगलनेही एखाद्या ठिकाणाचे क्षेत्रफळ आणि अंतर मोजण्यासाठी मेजर
(measure) हे टूल विकसित केले आहे. या टूलच्याआधारे एखाद्या ठिकाणापर्यंतचे अंतर तसेच क्षेत्रफळ मोजता येणार आहे. तुम्हाला जर ताजमहलची उंची मोजायची असेल किंवा तुमच्या घरापासून अमेरिका किती दूर आहे हे जाणून घ्यायचे असेल तर गुगल तुमच्या मदतीसाठी हजर आहे. गुगलने क्रोम आणि ऍण्ड्राईडवर गुगल अर्थच्या माध्यमातून measure हे टूल सादर केले आहे.

असे काम करणार मेजर टूल

गुगल अर्थ हे ऍप डाऊनलोड करून ज्या ठिकाणाचे अंतर मोजायचे आहे ते लोकेशन एंटर करावे.
स्क्रिनच्या सर्वात वर उजव्या कोपऱ्यावर तीन ठिपके दिसतील त्यावर क्लिक करून (measure) मेजर या टूल वर क्लिक करावे.
पहिल्या पॉईण्टला (ठिकाण) सिलेक्ट करण्यासाठी ऍड पॉईण्टवर क्लिक करा. त्यानंतर दुसरा पॉईण्ट (ठिकाण) सिलेक्ट करावे.
दुसरा पॉईण्ट सिलेक्ट झाल्यावर दोघांमधील अंतर समजू शकेल

आपली प्रतिक्रिया द्या