पायथ्यावरील बर्फ पथ्यावर! लेहमधील नुब्रा व्हॅलीत रंगला साहसी खेळांचा थरार

लेह-लडाख नुसतं नाव उच्चारलं तरी अनेकांच्या साहसी आठवणी जाग्या होतात. बाईक सफर, हायकिंग, बर्फातलं क्लायम्बिंग आणि त्यासाठी प्रसिद्ध नुब्रा व्हॅली, पेंगोंग लेक आणि तिथला थरार! डिसेंबर-जानेवारीत तर अॅडव्हेंचर स्पोर्ट्ससाठी अनेकजण लेह- लडाखमध्ये  धाव घेतात. सध्या नुब्रा व्हॅलीत तापमान उणे 20 डिग्री एवढे खाली घसरल्याने आईस क्लायम्बिंगला जोर आला आहे. पायथ्यावरील बर्फ साहसवीरांच्या पथ्यावर पडला आहे.

आईस क्लायम्बिंग हा साहसवीरांचा आवडता विषय. त्यासाठी पर्यटकांना युरोप, कॅनडा किंवा अन्य देशांमध्ये जावे लागते. मात्र आता लडाखमध्येही अशा साहसी खेळांना प्रोत्साहित केले जात आहे.

नुब्रा खोऱ्य़ातील पहिला उत्सव

नुब्रा व्हॅलीत तापमान उणे 20 पर्यंत खाली घसरल्याने झरे गोठले आहेत. नुब्रा व्हॅलीत पहिल्यांदा आईस क्लायम्बिंग फेस्टिवल साजरा करण्यात आला. सात दिवस चाललेल्या फेस्टिवलचे आयोजन नुब्रा अॅडव्हेंचर क्लबने केले. यामध्ये चार महिलांसह 18 जणांनी सहभाग घेतला. त्यांनी आधी ऐई गावांतील पृत्रिम ग्लेशियर आणि वारसी गावातील अॅडव्हेंचर क्लबमध्ये बर्फातील चढाईचे प्रशिक्षण देण्यात आले. कोरोना काळात खबरदारी घेऊन फेस्टिवल पार पडला. येत्या काळात नुब्रा विंटर स्पोर्ट्स फेस्टिवलचे आयोजित केला जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या