रुग्णाकडून नर्सचा विनयभंग, पश्चिम बंगालमधील धक्कादायक घटना

पश्चिम बंगालमध्ये रुग्णाने एका नर्सचा विनयभंग केला आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. काही दिवसांपूर्वी बंगालमध्येच एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून खुन करण्यात आला होता.

पश्चिम बंगालच्या बिरभुम भागात एका व्यक्तीला दाखल करण्यात आले होते. या रुग्णाला ताप आला होता आणि स्ट्रेचरवर त्याला रुग्णालयात आणले होते. नर्स जेव्हा या रुग्णाला सलाईन लावत होती तेव्हा या रुग्णाने नर्सला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. इतकंच नाही तर नर्सशी बोलताना या रुग्णाने अभद्र भाषा वापरली.

रुग्णालयात योग्य सुरक्षेअभावी काम करताना भिती वाटते अशी प्रतिक्रिया या नर्सने दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.