ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन

20

सामना प्रतिनिधी । निलंगा

ओबीसींच्या आरक्षणात बदल करण्यात येऊ नये, अनुशेष भरती करण्यात यावी, स्वतंत्र जनगणना करण्यात यावी अशा विविध मागण्यासाठी ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने येथील उपविभागीय कार्यालयाच्या समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

केंद्र सरकारच्या वतीने विविध समाजाच्या आरक्षणासाठी प्रयत्न सुरू केले असून यामुळे ओबीसी समाजात आरक्षण कमी होण्याची भीती निर्माण झाली आहे. मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण, धनगर समाजाच्या आरक्षण लिंगायत आरक्षण असे विविध आरक्षण राजकीय पटलावर येत असल्याने ओबीसी समाजात आपल्या आरक्षणात बदल करण्यात येईल, अशी भीती निर्माण झाल्याने ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या वतीने येथील उपविभागीय कार्यालयासमोर एक दिवसीय आंदोलन करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या