
ओबीसी आरक्षणासाठी दुसरा बळी गेला आहे. बीड जिह्यातील पिंपळनेर येथील गोरक्ष देवडकर यांनी ओबीसी आरक्षण आणि मुलीच्या नोकरीच्या चिंतेतून गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याआधी आरक्षण जाणार या धक्क्याने लातूरमधील एका रिक्षाचालकाने आत्महत्या केली होती.
देवडकर यांची मुलगी पोलीस भरतीची तयारी करत होती. मात्र ओबीसीतले आरक्षण संपल्यास तिची नोकरीची संधी जाईल, अशी चिंता देवडकर यांना होती. त्यातूनच त्यांनी जीवन संपवले.