
कुलाबा येथील मस्कारा कलादालनात आक्षेपार्ह चित्रांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. याने संताप उसळला असून पोलिसांनी चित्रकार व कलादालनाच्या मालकाविरोधात धार्मिक भावना भडकवल्याचा गुन्हा नोंदवला आहे.
अॅड. विशाल नाखवा यांनी कुलाबा पोलीस ठाण्यात याची तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत चित्रकार टी. वेंकण्णा व कलादालनाचे मालक अभय मस्कारा विरोधात गुन्हा नोंदवला आहे. याचा पुढील तपास सुरू आहे.
गॅलरी मस्करा कलादालनातील या प्रदर्शनातील चित्रे बिभत्स आहेत. लैंगिक कृतीची काही चित्रे यात आहेत. याने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप अॅड. नाखवा यांनी केला. 11 सप्टेंबरपासून हे चित्रप्रदर्शन सुरू झाले आहे.



























































