ओडीशातील लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवला, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची घोषणा

658

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊनची घोषणा केली होती. हा लॉकडाऊन वाढेल की उठवला जाईल याची सध्या देशभरात चर्चा सुरू असतानाच ओडीशा सरकारने लॉकडाऊन बाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायकने राज्यातील लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेणारे ओडीशा हे पहिले राज्य ठरले आहे.

गुरुवारी त्यांनी एक व्हिडीओ स्टेटमेंट जारी करून ही माहिती दिली आहे. तसेच यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील विमानसेवा, रेल्वे सेवा 30 एप्रलिपर्यंत सुरू न करण्याची विनंती देखील केली आहे. ‘आता आपण कोरोनाच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहोत त्यामुळे मी पंतप्रधानांना विनंती करतो की त्यांनी देशातील लॉकडाऊन देखील 30 एप्रिलपर्यंत वाढवावे व विमानसेवा, रेल्वे सेवाही बंद ठेवाव्यात’, असे पटनायक यांनी सांगितले.

सध्या ओडीशात कोरोनाचे 42 रुग्ण असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या