
दुबईतील दानुब ग्रुपने बॉलीवूडमधील किंग शाहरुख खानच्या नावाने एक प्रीमियर कमर्शियल टॉवर उभारण्याचे ठरवताच या टॉवरची संपूर्ण विक्री झाली आहे. जवळपास 10 लाख स्क्वेअर फूटमध्ये बनवल्या जाणाऱया या टॉवरची विक्री पाच हजार कोटींहून अधिक रुपयांना झाली आहे. ऑफिसच्या जास्त मागणीमुळे हा टॉवर लाँच होताच लोकप्रिय झाला आहे. दुबईतील प्रसिद्ध शेख जायद रोडवर बनवला जाणारा कमर्शियल टॉवर ‘शाहरुख्ज बाय दानुब’ जवळपास साडे तीन हजार कोटी रुपये किंमतीत तयार केला जात आहे. हा टॉवर बनवण्याआधीच पूर्ण विकला गेला आहे, असे दुबईतील एक्झिबेशन सेंटरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात दानुब ग्रुपचे फाऊंडर आणि अध्यक्ष रिझवान सज्जन यांनी सांगितले. या वेळी शाहरुख खानही उपस्थित होता.

























































