
बारामतीमध्ये झालेल्या भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघाताची चौकशी सुरू आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, अपघातापूर्वी क्रूचे शेवटचे शब्द ‘Oh Sh*t…’ असे होते. त्यानंतर क्षणार्धात विमान कोसळले. विमान मुंबईहून उड्डाण करून बारामती विमानतळावर उतरणार होते. उपमुख्यमंत्री अजित पवार हे विमानात दोन क्रू सदस्यांसह होते. कॅप्टन सुमित कपूर आणि सह-वैमानिक कॅप्टन संभावी पाठक, तसेच सुरक्षा अधिकारी विदीप जाधव आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी हे विमानात होते.
या अपघाताची चौकशी सुरू झाली आहे. त्यामध्ये वैमानिकांचे निर्णय, विमानतळाची परिस्थिती आणि तांत्रिक कारणे तपासली जातील. बारामती विमानतळाची ग्राउंड कंट्रोल सुविधा शहरातील दोन खाजगी एव्हिएशन अकादमी, रेडबर्ड एव्हिएशन आणि कार्व्हर एव्हिएशनमधील पायलट कॅडेट्सद्वारे चालवली जाते. ही ग्राउंड कंट्रोल सुविधा क्रूशी संपर्कात होती. डीजीसीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की विमानाने दुसऱ्यांदा लँडिंग करण्याचा प्रयत्न करताना नियंत्रण गमावले. त्यामुळे हा दुसरा लँडिंगचा प्रयत्न अयशस्वी ठरला.
डीजीसीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की विमान धावपट्टीच्या अगदी जवळच उतरले. त्यामुळे हवाई पट्टीतच अपघात झाला. मात्र, विमान नियंत्रणाबाहेर का गेले याचे निश्चित कारण समजू शकलेले नाही. तपास यंत्रणा आता हवामान, धावपट्टीची परिस्थिती आणि लँडिंगच्या वेळी पायलटच्या निर्णयांची चौकशी करत आहेत. डीजीसीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की अपघाताच्या कारणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. क्रूचे शेवटचे शब्द, ‘Oh Sh*t…’ असे होते. ते सूचित करतात की लँडिंग दरम्यान पायलटला अचानक कठीण परिस्थितीचा सामना करावा लागल्याची शक्यता आहे. अधिकाऱ्याने सांगितले की विमानतळाची ग्राउंड कंट्रोल सिस्टम आणि रनवेची तयारी देखील तपासली जात आहे.





























































