रत्नागिरीच्या जयगड येथे वृद्धाची गळफास घेत आत्महत्या

रत्नागिरी तालुक्यातील जयगड-पेठवाडी येथे वृध्दाने अज्ञात कारणातून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही घटना शनिवार 18 मार्च रोजी सकाळी 7.45 वाजता उघडकीस आली.

वनमाळी शिवराम मयेकर (65, रा. जयगड पेठवाडी, रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या वृध्दाचे नाव आहे. वनमाळी मयेकर यांनी राहत्या घराच्या पडवीतील छताला असलेल्या लोखंडी चॅनलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही बाब त्यांच्या नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी त्यांना गळफासातून खाली उतरवून उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद खंडाळा येथे दाखल केले होते. तेथील वैद्यकिय अधिकार्‍यांनी वनमाळी मयेकर यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.