ऑलिम्पिक संयोजनावरून क्रीडा जगतात मतभेद

टोकियो ऑलिम्पिक नियोजित वेळी घ्यावे की कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलावे यावरून आता जागतिक क्रीडा जगतात उभी फूट पडली आहे.

अमेरिकन ऑलिम्पिक समितीच्या प्रमुख सुजैन लियोंस यांनी ऑलिम्पिकला अद्याप काही महिन्यांचा अवधी आहे. आताच ऑलिम्पिक स्थगित करण्याचा निर्णय घेण्याची गरज नाहीय. याबाबत जागतिक आरोग्य संघटना आणि वैद्यकीय, क्रीडा तज्ज्ञांची मते घेऊन अंतिम निर्णय घ्यायला हवाय असे म्हटले आहे. तर अमेरिकन जलतरण महासंघाचे मुख्य कार्यकारी टीम हिंचे यांनी कोरोनाचा जगभरातील धुमाकूळ पाहता टोकियो ऑलिम्पिक किमान एक वर्ष पुढे ढकलावे असे पत्र अमेरिकन ऑलिम्पिक संघटनेला पाठवले आहे. फ्रान्सच्या ऑलिम्पिक समितीनेही या स्पर्धा पुढे ढकलणेच योग्य ठरेल असे ठाम मत व्यक्त केले आहे.

“आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांत ऍथलेट्सच्या कामगिरीसोबत त्यांची मानसिक स्थितीही आपण पाहायला हवी.आताची जागतिक महामारी पाहता खेळाडूंवर ऑलिम्पिकमध्ये सहभागी होतांना कोरोनाच्या भयाचे सावट असणारच. हे लक्षात घेता आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने टोकियो ऑलिम्पिक काही काळासाठी पुढे ढकलणेच योग्य ठरेल.”
– बॉब बोमैन,चॅम्पियन ऑलिम्पिअन जलतरपटू मायकेल फेल्प्सचे प्रशिक्षक

आपली प्रतिक्रिया द्या