ओमायक्रॉनचा पुरुषांच्या ‘प्रायव्हेट पार्ट’वर होत आहे परिणाम, वाचा तज्ज्ञ काय म्हणाले…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. ओमायक्रॉनचे प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. यामध्ये बरेच लोक लॉन्ग कोविडलाही बळी पडत आहेत. त्यामुळे बरे होऊनही त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, ब्राझीलच्या एका मॉडेलने दावा केला आहे की, कोविडमुळे तिच्या बॉयफ्रेंडच्या प्रायव्हेट पार्टची लांबी कमी झाली आहे.

‘डेली स्टार’च्या वृत्तानुसार, 31 वर्षीय मॉडेलचे नाव सुजी कॉर्टेज आहे. सुझीने अलीकडेच दावा केला की, कोरोनामुळे तिच्या प्रियकराचा ‘प्रायव्हेट पार्ट छोटा झाला’. तिच्या प्रियकरानेच तिला याबाबत सांगितले असल्याचे ती म्हणली आहे.

सुझी कॉर्टेझ म्हणाली की, ”आपण सर्वांनी ऐकले आहे की, कोरोनाव्हायरसमुळे आजारी पडल्याने थकवा, चव, वास कमी होणे किंवा सतत खोकला येऊ शकतो, परंतु विषाणूचा आपल्या शरीराच्या रचनेवर परिणाम झाल्यास आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे.” सुझी आता लोकांना कोरोनापासून वाचवण्यासाठी मास्क घाला, सोशल डिस्टन्सिंग पाळा असे सल्ले देत आहे.

यावर डॉक्टर काय म्हणतात?

SARS-CoV-2 विषाणूवर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांचा दावा आहे की, कोविडचा प्रायव्हेट पार्टच्या ऊतींवर परिणाम होऊ शकतो. इरेक्टाइल डिसफंक्शन देखील असू शकते, ज्याला सामान्य भाषेत नपुंसकत्व देखील म्हणतात.

अमेरिकन तज्ज्ञ काय म्हणाले?

यावर बोलताना अमेरिकेचे युरोलॉजिस्ट ऍशले विंटर एमडी म्हणतात की, कोविड नंतर प्रायव्हेट पार्ट लहान होणे हा इरेक्टाइल डिसफंक्शनचा दुष्परिणाम आहे. ते म्हणाले, “इरेक्टाइल डिसफंक्शनमुळे लिंग लहान होते हे खरे आहे.”

डॉ. ऍशले विंटर यांनी सांगितले की, जेव्हा कोविड पुरुषाचे जननेंद्रिय असलेल्या रक्तवाहिन्यांच्या एंडोथेलियल पेशींमध्ये प्रवेश करते, तेव्हा ते रक्तप्रवाहात अडथळा आणू शकते. शास्त्रज्ञांनी असेही म्हटले आहे की, कोरोना आजारामुळे केवळ श्वसनाची लक्षणेच उद्भवत नाहीत. त्याच्या इतर वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे रक्ताची गुठळी होण्याची वाढती प्रवृत्ती आहे, ज्यामुळे अनेकदा मृत्यू होतो.