मुंबई-गोवा महामार्गावर लांजा शहरात गेला महिनाभर उनाड दहा ते बारा गुरांचा त्रासदायक ठरत आहे. गुरांच्या उपद्रवामुळे व्यापारी, नागरिक व वाहनचालक हैराण झाले असून यापासून अपघात होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. गुरांचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी वाहन चालक व प्रवाशातून होत आहे.
गणेशोत्सव काळातही नागरिकांना गुरांचा त्रास सहन करावा लागला. लांजा शहरात मुंबई-गोवा महामार्गावर वाहनचालकांना, व्यापारी, प्रवाशी व स्थानिक रहिवाशी यांना शहरातील उनाड गुरांचा त्रास सहन करावा लागत आहे. महामार्गावर दिवसा व रात्री-अपरात्री ही उनाड गुरे महामार्गाच्या मध्यभागी अचानक आडवी येत असल्याने वाहनचालक, प्रवाशांसमोर संकट उभे राहते आहे. त्यामुळे उनाड गुरांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी नगरपंचायतीला या प्रकाराबाबत समज दिली आहे. दरम्यान शेतीची कामे आटोक्यात आल्याने या पाळीव गुरांना शेतकरी मोकाट सोडून देत आहेत. त्यामुळे अन्नासाठी गुरे बाजारपेठेत मोकाट फिरताना दिसत आहेत. उनाड गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी लांजा नगरपंचयातीने दोन वर्षांपूर्वी ठोस पावले उचलली होती.
प्रशासनाने बंदोबस्त करावा
शहरात कोर्ले फाटा, बाजारपूल, नगरपंचायत परिसर, पेट्रोलपंप, बसस्थानक, साटवली फाटा, लांजा हायस्कूल, कुक्कुटपालन याठिकाणी उनाड गुरे महार्गावर कळपाने दिसून येत आहेत. परिणामी वाहतूक काsंडीची समस्या निर्माण होते. या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीने अशा मोकाट गुरांचा पुन्हा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.