‘Once मोअर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

रहस्याचा खजिना असलेल्या ‘Once मोअर’ या आगामी चित्रपटाचे पोस्टर आणि त्याची पहिली झलक प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटात नेमके काय असणार? याविषयी तर्क-वितर्क लढवले जात होते. चित्रपटाचे पोस्टर आणि पहिल्या प्रोमोवरून रहस्यावर आधारित हा चित्रपट असल्याचे लक्षात आले होते, मात्र चित्रपटातील पात्रांचा खुलासा यातून झाला नव्हता. ‘लॉजिकल जगातील मॅजिकल गोष्ट’ अशी टॅग लाइन असलेल्या या टीझरमधून भेटीला आलेली चित्रपटातील पात्र लक्ष वेधून घेत आहेत. या चित्रपटामधून नेमका कोणत्या गोष्टीचा रहस्यभेद होणार याचा उलगडा 12 ऑक्टोबरला होईलच. तत्पूर्वी चित्रपटाच्या पहिल्या टीझरने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आशुतोष पत्की आणि धनश्री दळवी या नव्या चेहऱयांसोबत रोहिणी हट्टंगडी, पुर्णिमा तळवलकर, भारत गणेशपुरे, सुशांत शेलार, विष्णू मनोहर, नरेश बीडकर आदी मराठी सिनेसृष्टीतील अनुभवी कलाकार या चित्रपटात आहेत.