विमानतळांवर फक्त एकच बाटली! ‘ड्युटी फ्री’ मद्य खरेदीवर येणार निर्बंध

737
liquor Liqueur

यापुढे विमानतळांवरील डय़ुटी फ्री शॉपमधून फक्त मद्याची एकच बाटली खरेदी करता येणार आहे. जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंची आयात कमी करण्यासाठी मद्यावर मर्यादा घालण्याचा सरकारचा विचार आहे. येत्या 1 फेबुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. या पार्श्वभूमीवर अर्थ मंत्रालयाने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना ही शिफारस केली आहे. याशिवाय डय़ुटी फ्री शॉपमधून एक कार्टन सिगारेट खरेदी करण्याची सुविधाही बंद करण्याचा सरकारचा विचार आहे.

सध्याच्या नियमांनुसार परदेशातून येणारे प्रवासी विमानतळांवरील डय़ुटी फ्री शॉप्समधून दोन लिटर दारू आणि एक कार्टन सिगारेट खरेदी करू शकतात. जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंची आयात कमी करण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करीत आहे. शुल्क मुक्त म्हणजे डय़ुटी फ्री दुकानांतून परदेशातून हिंदुस्थानात येणारे प्रवासी सुमारे 50 हजार रुपयांपर्यंतचे सामान खरेदी करू शकतात आणि त्याच्यावर आयात शुल्क द्यावे लागत नाही.

आपली प्रतिक्रिया द्या