उदगीर तालुक्यातील हाळी येथील कोरोना रुग्णाचा मृत्यू

1964

उदगीर तालुक्यातील मौजे हाळी येथील 75 वर्षांच्या कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान उदगीर येथील सामान्य रुग्णालयात सोमवारी मृत्यू झाला. उदगीर येथे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 9 वर पोहोचली आहे. मौजे हाळी येथील 75 वर्षांच्या रुग्णाला 28 जून रोजी उदगीर येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सुमारे 9 दिवसांच्या उपचारानंतर सोमवारी त्याचा मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या