बुलढाण्यात आढळला एक कोरोनाचा रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 37 वर 

926

बुलढाण्यात आज एक कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 37 वर पोहोचली आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी  आज  33 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 32 अहवाल निगेटीव्ह व एक अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. पॉझीटीव्ह अहवाल हा टुनकी, ता. संग्रामपूर येथील 17 वर्षीय युवकाचा आहे. मुंबई येथून परत आला असल्याचा प्रवास इतिहास आहे. आतापर्यंत 906 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.  जिल्ह्यात एकूण 37 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नरवेल ता. मलकापूर येथील पाच वर्षीय चिमुकलीला आज सुट्टी देण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत 26 कोरोनाबधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे कोविड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 26 आहे.  सध्या रूग्णालयात 08  कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

तसेच आज 24 मे रोजी 33 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 32 निगेटीव्ह, तर एक पॉझीटीव्ह आहेत.  तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने 105 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 906 आहेत, अशी माहिती निवासी  उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या