पंढरपूरात कोरोनाचा शिरकाव; मुंबईहून आलेल्या तरुणाला कोरोनाची लागण

617

पंढरपूर शहर आणि तालुक्यात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी प्रशासकीय यंत्रणेने आवश्यक त्या उपाययोजना केल्या होत्या. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. मात्र, लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर मुंबईहून आलेल्या तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. हा तरुण तालुक्यातील उपरी गावचा रहिवासी असून गावी आल्यानंतर त्याचे विलगीकरण करण्यात आले होते. दोन दिवसांपासून त्याला कोरोनाची लक्षण दिसून येत असल्याने त्याच्यावर पंढरपूर येथे उपचार सुरु होते. त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संपूर्ण उपरी गाव सील करण्यात आले आहे. तसेच प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी गावाला भेट देऊन रुग्णांच्या कुटुंबाची माहिती घेतली.

आपली प्रतिक्रिया द्या